नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.
सध्या कोरोना व्हायरसंबंधी देशात काय स्थिती आहे यासंबंधी हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांनी सांगितले की, दिल्लीमधील प्रकरणात पीडित रुग्ण जवळपास ६६ लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची निष्पन्न झाले आहे. तर तेलंगणामधील पीडित रुग्ण ८८ लोकांच्या संपर्कात आला होता. दरम्यान देशभरात एकूण २८ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यात सुधारणा झाली असल्याचे यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितल.