नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन या औषधाने उपचार करण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा डब्ल्यूएचओने सल्ला दिला होता. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. .