नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयपीएलच्या आयोजनावरून सुरू असणारा संशयकल्लोळ संपुष्टात आला असून यंदाची स्पर्धा ही भारतातच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
भारतात ज्या काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्यावेळी ही स्पर्धा भारतात होणार की नाही, याबाबत संशयकल्लोळ होता. परंतु, मंगळवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत ही स्पर्धा भारतातच घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याआधी ही स्पर्धा दोनदा भारताबाहेर खेळवली गेली. २००९मध्ये दक्षिण आफ्रिका आणि २०१४मध्ये यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. यंदा मात्र लोकसभा निवडणुकीचा कालखंड असूनही आयपीएल भारतातच होणार आहे.