भादली येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या;

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील तरूणाने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमिल बन्ने खान रा. सिहोर मध्यप्रदेश ह.मु. भादली ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. अमिल हो मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. २९ रोजी सकाळी अमिलचे आई-वडील खासगी कामाच्या निमित्ताने मालेगाव येथे गेले होते. त्यावेळी अमिल हा घरात एकटाच होता. दरम्यान घरी एकटा असल्यामुळे राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content