जळगाव प्रतिनिधी । घरात कोणीही नसतांना मध्यरात्री 32 वर्षीय तरुणाने बंद घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली, या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र मधुकर कोळी वय-३२ रा. भादली ता.जि. जळगाव हा सेंटिंग काम करतो. त्याची आई नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या होत्या, तर पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. घरात कोणीही नसतांना मध्यरात्री दोरीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी नातेवाईकांच्या लक्षात आलं. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. 5 दिवसापूर्वी त्याला मुलगा झाला आहे. त्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आले, या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.