जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक येथे पोस्ट मास्तर दिलीप बाजीराव इंगळे यांच्या स्वखर्चातून कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे गावातील बऱ्याच वृद्ध, अपंग निराधार परितक्त्या कुटुंबाचा रोजगार बंद झाल्यामुळे ते आर्थिक कोंडीत अडकल्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने त्यांनी २५ कुटुंबाना धान्याचे किट वाटण्याचा वाटण्याचा कार्यक्रम झाला.
भादली गावात त्यानुसार धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. वाटप प्रसंगी पोलीस पाटील, ॲड. राधिका ढाके, हभप गोपाळ ढाके, प्रमोद पाटील, अशोक पाटील, अरुण सपकाळे, पोस्टमन विलास भालेराव, सुनिता सपकाळे, सेवानिवृत्त पोस्टमास्तर मुरलीधर रडे आदी उपस्थित होते.