Home Cities अमळनेर भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे जिल्हा दौर्‍यावर

भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे जिल्हा दौर्‍यावर

0
34
anil bornare

anil bornare अमळनेर प्रतिनिधी । भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे हे जिल्हा दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत सहविचार सभा होणार आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवाशर्तीच्या समस्यांबाबत जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्यासमवेत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीची सहविचार सभा २२ मे रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात होणार असून यासाठी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे उपस्थित राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शाळांमधील आर टी ई मान्यता, वेतनेतर अनुदान, पीएफ निधी वितरण, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनाचे प्रलंबित प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शिक्षकांची सेवाजेष्ठता या विषयावर बैठकीत चर्चा होणार असून अनिल बोरनारे यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडी नाशिक विभाग संयोजक महेश मुळे, जळगाव जिल्हा संयोजक प्र.ह.दलाल व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

राज्यातील शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्‍नांबाबत भारतीय जनता पक्षाने शिक्षक सेल सुरू केला असून राज्यातील सर्व विभागामध्ये शिक्षक आघाडीचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आघाडीच्या कार्यकारणी स्थापन करण्याबाबत तसेच भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचा विस्तार करण्यासंदर्भात भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष व राज्य सहसंयोजक अनिल बोरनारे २२ मे पासून जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत चर्चा करणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound