भाजप खासदाराला नाच्यासारखा नाचविन – पालकमंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव  प्रतिनिधी । मी शिवसेनेचा सोंगाड्या आहे , भाजपच्या खासदाराला याच्यासारखा नाचविणं . त्यांनाही माहिती आहे कि तमाशातला सोंगाड्या चांगला असला तर चांगल्या चांगल्यांना नाचवतो , अशी टीका आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर केली .

सत्ता नसताना शेतकऱ्यांसाठी गुलाबराव पाटील शिंगाडा मोर्चा काढायचे ते आज सोंगाड्या झाले आहेत अशी टीका आधी खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती . त्या टीकेला आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले .

शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात भाजप आंदोलन करणार आहे , या आंदोलनाकडे कसे पाहता ? , या प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की ., मोर्चा काढणे त्यांचे काम आहे . केळीच्या बाबतीत ते विनाकारण भांडवल करीत आहेत . जिह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विम्याबद्दल राज्याने केंद्राकडे ४ वेळा पाठपुरावा केला होता केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबतच्या बैठकीत केळीबेल्ट मधील आमदार म्हणून आ. शिरीष चौधरीही सहभागी होते आम्हीही होतो. त्यावेळी केंद्राने सांगितले होते की यावर्षी निकष बदलता येणार नाहीत येथे मोर्चा काढण्यापेक्षा त्यांनी पूर्वीचे निकष लागू करायला पंतप्रधानांना सांगावे मोर्चा काढण्याएका ची गरज पडणार नाही .
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की , १ डिसेम्बरपासून राज्यात शेतमाल खरेदी केंद्रे सुरु होत आहेत हे त्यांनाही माहिती आहे . पण आमच्यामुळे ही केंद्रे सुरु झाली अशी टिमकी वाजवण्यासाठी त्यांची मोर्चायची धडपड सुरु आहे . गतवर्षी राज्यात १५ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करून सरकारने शेतमाल खरेदी केली मका , कपाशी खरेदी केली त्यांनी माझ्या स्टेजवर यावे आणि सान्गावे की आम्ही पाठपुरावा केला नाही मी मंत्रिपद सोडींन नाहीतर त्यांनी खासदारकी सोडावी असे आव्हानही गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले . १ लाखाच्या विम्यासाठी कुणी ६५ हजार कसा भरीन ? हे गणित ते बाहेर सांगत नाहीत त्यांनी केंद्राकडे बोंब पाडावी न … ४ वेळा पाठपुरावा केल्याचे आयुक्तांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले , ते खोटे आहेत का? , असा प्रतिप्रश्नही त्यांनी भाजपला केला

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4074573059237400/

Protected Content