अहमदाबाद : वृत्तसंस्था । भाजप खासदार परबत पटेल यांचे नाव घेतले जात असलेल्या सेक्स व्हिडीओमुळं गुजरातेत खळबळ उडाली आहे
या व्हिडिओचा फोटो दाखवून आम आदमी पक्षाचे माधाभाई पटेल यांनी दावा केला की तो १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडिओ समोर आणणार आहे. मात्र, त्याआधी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचे दावा करण्यात येत आहे. पटेल यांनी हा व्हिडीओ षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे तर त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बनासकांठाच्या आम आदमी पक्षाचे नेते माधाभाई पटेल यांनी या व्हिडिओसंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यांनी पोस्टसह फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नव्हता, पण माधाभाईंनी लिहिले होते की ते या भाजप नेत्याचा संपूर्ण व्हिडिओ १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करतील.
ही फेसबुक पोस्ट व्हायरल होताच भाजपा नेते आणि खासदार परबत पटेल यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. व्हायरल व्हिडिओबद्दल आपल्याला जास्त माहिती नसल्याचे खासदार पटेल यांनी म्हटले. त्यांचा दावा आहे की त्यांचा आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार करण्यात आला आहे. पटेल यांनी मुलीची ओळख करण्यासही नकार दिला आहे. ते म्हणाले की यापूर्वीही त्याला ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचे प्रयत्न झाले आहेत. “मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला गेला असल्याची शक्यता आहे.”असे पटेल यांनी मांडले.
आप नेते मघाभाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खासदार परबत पटेल पालनपूरच्या शासकीय अतिथीगृहात अश्लिल चाळे करताना पकडले गेले असल्याचे म्हटले आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी परबत पटेल यांच्या मुलाने माधभाई पटेल आणि मुकेश राजपूत या दोघांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे पुत्र शैलेश म्हणाले की, माझे वडील निर्दोष असून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने परबत भाई पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये खासदार एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत बसलेले दिसत आहेत. बनासकांठाचे पोलीस उपअधीक्षक पी एस चौधरी म्हणाले की, बनसकांठाचे भाजपा खासदार परबत भाई पटेल यांचा अश्लील व्हिडिओ इंटरनेट मीडियामध्ये व्हायरल करण्याबाबत खासदारांकडून तक्रार प्राप्त झाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या एकाला अटक केली आहे.