भाजप आमदाराकडून रामदेवबाबांचे समर्थन

 

प्रयागराज : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांचं समर्थन केलं आहे.

 

आज अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत.  अ‍ॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत, असं सुरेंद्र सिंह म्हणालेत.

 

रुग्णाच्या मृत्यूनंतर अ‍ॅलोपॅथी डॉक्टर रुग्णाला आयसीयूमध्ये ठेऊन पैसे वसूल करतात,” असा आरोपही सुरेंद्र सिंह यांनी केलाय. सामाजाने आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि योग अभ्यास या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असं आवाहन भाजपा आमदाराने केले. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीची तुलना करताना सुरेंद्र सिंह यांनी दोन्ही उपचार पद्धती समान असल्याचं म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांनी आपण मनापासून बाबा रामदेव यांचं अभिनंदन करतो असंही म्हटलं आहे. “रुग्णांची काळजी घेण्यासाठी अगदी मानापासून काम करणाऱ्या अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचं मला कौतुक आहे. मात्र याच अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी काहीजण भ्रष्ट असून त्यांचा मी विरोध करतो,” असंही म्हटलं आहे.

 

यापूर्वीही सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र नियमितपणे प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही असा दावा केला होता. आपला दावा सिद्ध करण्यासाठी सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र पितानाचा एक व्हिडीओ  व्हायरलही केला होता. या व्हिडीओमध्ये सुरेंद्र सिंह यांनी आपण नियमितपणे गोमूत्र पितो असं सांगताना दिसत आहे.

 

Protected Content