Home धर्म-समाज भाजपा सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : नंदकिशोर महाजन

भाजपा सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : नंदकिशोर महाजन

0
40

रावेर, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तसेच त्यांनी सुरु केलेल्या योजना प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरापर्यंत पोहचावे म्हणुन प्रत्येक कार्यकर्तेनी सज्ज राहावे, उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन  नंदकिशोर महाजन यांनी केले.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त “सेवा व समर्पण अभियान” भाजपातर्फे रावेर तालुक्यात राबविले जात आहे. यानिमित्त आज भाजपातर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविले गेले.  गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार कार्यकर्ते यांच्या समोर मांडले.

 

यांची होती उपस्थिती

“सेवा व समर्पण अभियान” निमित्त आयोजित पंचायत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, समिती सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, पं.स.सदस्या अनिता चौधरी,भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, योगिता वानखेड़े,जुम्मा तडवी,पी. के. महाजन हरलाल कोळी, संदीप सावळे आदी भाजपा लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

भाजपातर्फे मोफत रेशन बॅग वाटप

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकानामध्ये  मोफत धान्य वाटप करण्यात आली. यावेळी  मोफत रेशन बॅग वाटप करण्यात आल्या. जनतेला स्वच्छते बद्दल जन-जागृती करण्यात आली. रावेर, मस्कावद, तांदवाडी, रसलपुर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

 


Protected Content

Play sound