जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी आणि व्यापाऱ्यांवर होणारे हल्ले तातडीने थांबवा व हल्ले करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोरात करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक राठी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना बुधवारी ६ एप्रिल रोजी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून निरपराध व्यापारी बांधवांवर हल्ले होत आहे. या हल्ल्याने व्यापारी बांधवांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच नांदेड येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले व गोरगरिबांना बांधवांना मदत करणारे व्यापारी व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा निर्घुण हत्या करण्यात आली. अशाच प्रकारच्या घटना महाराष्ट्र राज्यात घडत असून निरपराध नागरिक व्यापारी आणि व्यवसायिक बांधवांचे नाहक बळी जात आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हत्या आणि लूटमार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसाढवळ्या खून होत असल्याने कायदा सुव्यवस्था कोलमडली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहेत. पोलिस प्रशासनाने नांदेड येथे खून झालेल्या व्यापारी बांधव यांच्या हल्लेखोरांना शोधून कठोर शिक्षा करावी तसेच जळगाव शहरात खून, हत्या व हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा करावी व शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ठिकाणी पोलीस संरक्षण व जास्तीत जास्त गरज ठेवाव्यात असे मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनावर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक राठी, आ.राजूमामा भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विनय बाहेती, प्रकाश डोडीया, प्रकाश पंडीत, निखील सुर्यवंशी, निर जैन, निर्मल तिवारी, अजय जोशी, परेश जगताप, भोजराज रातपूत यांच्यासह आदी व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.