जळगाव प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १४ एप्रिल रोजी १३० वी जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कार्यालयात आणि रेल्वे स्थानकासमोरील पुतळ्याला भाजपा महानगरतर्फे मनपा स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आज सकाळी ९ वाजता बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर ९.३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी आणि महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी माल्यार्पण केले.
याप्रसंगी नगरसेवक राजूभाऊ मराठे, जिल्हा कार्यलय मंत्री प्रकाश पंडित, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश भावसार, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, सरचिटणीस शांताराम गावंडे, हॉकर्स आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष लताताई बाविस्कर, अनुसूचित जाति मोर्चा, सरचिटणीस कैलास सोनवणे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय बारी यांच्यासह आदी उपस्थित होते.