फैजपूर,प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती या पंधरवड्यात भारतीय जनता पार्टीकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आज भाजपा किसान मोर्चातर्फे शेतकरी व सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यावल तालुका विद्यमाने देशाच्या सीमा सुरक्षित करणारे जवान व देशासाठी अन्नधान्याची पूर्तता करणारे किसान यांचा स्वागत सत्कार करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भूषण राजेंद्र चौधरी अट्रावल, मोतीलाल चिमण बेंडाळे रा. बामणोद व प्रगतिशील शेतकरी भागवत दयाराम फेगडे बामणोद , जीवन रूपचंद पाटील फैजपूर, माजी सैनिक जगन्नाथ निंबा बाविस्कर व नामदेव उखर्डू कापडे हंबर्डी, माजी सैनिक यांचा सन्मानपत्र व उपरणे टोपी देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी बी. के. चौधरी, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा नारायण बापू चौधरी, किसन मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोजराज राणे, किसान मोर्चा यावल तालुकाध्यक्ष सागर राजेंद्र महाजन, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, शहराध्यक्ष फैजपूर अनंत नेहेते, तालुका चिटणीस किशोर पाटील, राजेश महाजन, किरण महाजन, श्याम भंगाळे ,शहरअध्यक्ष भाजयुमो यांचेसह बरेच कार्यकर्ते हजर होते.