यावल, प्रतिनिधी। केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्यातील महा विकास आघाडी शासनाच्या विरोधातील दि.९ नोव्हेंबरच्या किसान मोर्चा संदर्भात यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची येथे बैठक घेण्यात आली.
खासदार रक्षा खडसे यांनी पक्षाच्या उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांविषयीच्या भुमिकेबाबत पदधिकारी यांना मार्गदर्शनातुन अवगत केले. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, जळगाव जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक तथा कृषीभूषण नारायण चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद जिवराम महाजन, भाजपाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव, डॉ. विजय धांडे, टी. के. महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश पाटील, यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल गोवींदा पाटील, कृऊबास. सभापती पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे व यावल, सांगवी, कठोरा, चितोडे, सातोद, कोळवद, वड्री, परसाळा, मोहराळा, कोरपावली, राजोरा, मायसांगवी, अट्रावल, बोरावल, भालशिव, पिंप्री, अंजाळा, निमगांव, टेंभी, टाकरखेडा, विरावली, महलखेडी या गांवातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.