भोपाळ (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. भोपाळमधील भाजपा कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित असतांना ठाकूर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना घरी नेण्यात आले.
लॉकडाऊन सुरू होण्याआधीपासून भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अनलॉक सुरू होताच ठाकूर भोपाळमध्ये परतल्या. कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पक्ष कार्यालयात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोवळ येऊ लागली. त्यानंतर लगेचच त्यांना खुर्चीत बसवण्यात आले. थोड्या वेळाने त्यांना घरी नेण्यात आले. सध्या प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या घरी आहेत.