भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचे षडयंत्र — खासदार उन्मेष पाटील(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचे एक षडयंत्र केले गेले. यासंदर्भात अपील करण्यात आले असून त्याचा निकाल २६ तारखेला येणार आहे. यात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले पाहिजे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद करणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा खून करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी मांडले.

 

याप्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हादराव पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील विशाल त्रिपाठी, महेश जोशी, ओबीसी जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, कार्यलय मंत्री गणेश माळी, मनोज भांडारकर, चंद्रशेखर अत्तरदे आदी उपस्थित होते.

खासदार उन्मेष पाटील यांनी पुढे सांगितले की, ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला. राज्य सरकारने वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरेद्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी. ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्याच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले. गेल्या महिनाअखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भरपडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का, असा सवालही त्यांनी केला. लखीमपुरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठींबा देणाऱ्या महा विकास आघाडीला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का ? असा प्रश्न उपस्थित केला.

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/600239457782367

भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1576446886027913

 

Protected Content