जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज,प्रतिनिधी । महापालिका शहरातील नागरिकांकडून वाढीव घरपट्टी आकारत असून यांच्या निषेधार्थ भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या ९ मंडळामध्ये या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा प्रारंभ मंडळ ४ गणेश कॉलनी येथे व मंडळ क्र ६ येथील काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी ६ वाजता घेण्यात आला.
आमदार राजुमामा भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्वाक्षरी अभियानाची” सुरवात करण्यात आली. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितलेकी, महाराष्ट्र कुठल्याच महानगर पालिकेचे एवढे मोठे करआकारणी नसून एवढे कर जळगाव महानगर पालिकेचे आहे. जनता आधीच दोन वर्षांपासून कोरोना महामारीला तोंड देत असून यात मनपा सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी जळगावच्या जनतेवर वाढीव घरपट्टीचा बोझा जनतेवर टाकला आहे. भाजपा हा नेहमीच सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी लढणारा पक्ष असुन आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आम्ही सेवा समर्पण करून आज स्वाक्षरी अभियानाची सुरवात करत आहोत. शहरातील ९ मंडलात हे अभियान राबविण्यात येणार असुन असे राजुमामा भोळे यांनी या प्रसंगी सांगितले. अभियानला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, दीपक साखरे विधान सभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंह निकम, राजु मराठे, चंद्रशेखर अत्तरदे, प्रकाश पंडित, धिरज वर्मा, अक्षय चौधरी मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे,अजित राणे, शक्ती महाजन, चेतन तिवारी, उमेश सूर्यवंशी, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, हेमंत जोश, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, भरत सपकाळे, कुमार श्रिरामे, सना जहागिर खांन, नगरसेवक दीपमाला काळे, अॅड शुचीता हाडा, गायत्री राणे, अमित काळे, मनोज काळे, अतुल हाडा, दिनकर बारी, सरोज पाठक, भाग्यश्री चौधरी, दिनेश पुरोहित, यशवंत पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/447097290484212