भाजपमध्ये ‘इनकमींग’ : अनेकांचा पक्षात प्रवेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षात शहरातील अनेक मान्यवरांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

 

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.   यामध्ये कामगार नेते कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष संघटित कामगार  गणेश बारसे,  भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, म न पा सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र पाटील, महेश कापुरे, प्रशांत शुक्ला, लक्ष्मीनारायण पांडे,  निलेश पाटील आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

 

या सर्वांचे पक्षाचा गमछा प्रदान करून त्यांचे पक्ष मध्ये स्वागत भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केले. याप्रसंगी सर्व प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, जिल्ह्याचे  नेते ना. गिरीश भाऊ महाजन व जळगाव शहराचे आमदार  राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली  काम करण्याची इच्छा व्यक्त केली असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.

 

या पक्ष सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिताताई वाघ, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्यासह मनपा  गट नेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, प्रल्हाद सोनवणे, ग्रामीणचे गोपाळ भंगाळे व संजय भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content