भुसावळ प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे आज (ता. २३) आमदार संजय सावकारे यांचे कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची यावेळी होळी करण्यात आली. राज्य सरकारने ८ दिवसांत थकीत वीजबिलाची चौकशी करावी, शेतकऱ्यांकडे थकीत असलेलं वीजबिल काही भ्रष्टाचार नाही, पण वीजबिल माफी करावी,’ अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
आंदोलनास भाजपा भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजु नाटकर, पिंटु कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षीत बर्हाटे, गिरीष महाजन, अॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रविण इखणकर, सुनील महाजन, नरेंन्द्र पाटील, नागो पाटील, बिसन गोहर, राजु खरारे, शाम माहुरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, देवेश कुलकर्णी, नंदकिशोर बडगुजर, प्रा.प्रशांत पाटील, अमित असोदेकर, दिनेश दुधानी, शेखर इंगळे, चेतन बोरोले, रमा़शंकर दुबे, राहुल तायडे, लोकेश जोशी, केतन पाटील, राजु चव्हाण,निखील वायकोळे, अविनाश बर्हाटे, नरेन्द्र बर्हाटे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
महाराष्ट्र शासनाने आर्थिक व दुर्बल घटकातील ० -१०० युनिट विज वापरणाऱ्या ग्राहकांचे ५ वर्षाचे विज बिल माफ करू ही घोषणा पूर्ण करावी. महाराष्ट्र शासनाने सरासरी विज बिलाची दुरूस्ती करावी. महाराष्ट्र शासनाने कोविड – १९ संचारबंदी काळातील मार्च / एप्रिल / मे / जुन या ४ महिन्यांचे ० – १०० व १०० – ३०० या वर्गातील विजचे बिल माफ करावे. विज बिल माफी करीता लागणारे विशेष अनुदान शासनाने विज कंपनीला दयावे व विज कंपनीने विज बिल शुन्य करावे.