भाजपातर्फे दुध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन आ. चव्हाण यांचा नागरी सत्कार

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आ. मंगेश चव्हाण यांची जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांची व तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास तसेच आपल्या नेतृत्वाचा आणि जनतेचा विश्वास संपादित केल्यास आपल्याला पद आणि  जबाबदाऱ्या मागायची वेळ येत नाही तर त्या जबाबदाऱ्या आपसूकपणे आपल्याकडे येतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन तसेच राज्य शासनाच्या व विकास दुध संघाच्या माध्यमातून येत्या काळात किमान १ हजार कोटी रुपयांची विकासकामे चाळीसगाव तालुक्यात आणायची असून त्यातील ७० टक्के कामे आपल्या कालावधीतच पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नवीन निवडणुका झालेल्या २२ ग्रामपंचायतीना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले. सोबतच ज्याप्रमाणे आजपर्यंत आशा-अंगणवाडी सेविकांच्या मुलींच्या जवळपास ५० लग्नांसाठी मामा म्हणून प्रत्येकी २५ हजारांची मदत केली. त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा कणा असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा आमदार चव्हाण यांनी केली.

माजी आमदार साहेबराव घोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रमाणे सहकारात देखील भाजपापुढे गेल्यास निश्चितपणे त्याचा फायदा पक्षाला व कार्यकर्त्यांना होतो.  मात्र, जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी भाजपाला माघार घ्यावी लागली असता मी याबाबत खासदारांकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र ती कसर आमदार मंगेश चव्हाणांनी दुध संघाच्या निवडणुकीत भरून काढली. पूर्ण जागा बिनविरोध करा मात्र मी मुक्ताईनगर मधूनच लढणार असा निर्धार त्यांनी केला आणि आज त्या एका भूमिकेमुळे भाजपला दूध संघात घवघवीत यश मिळाले. दुसऱ्या मतदारसंघात जाऊन विजय तर मिळविलाच मात्र विजयी झाल्यानंतर त्यांनी विजयाचे श्रेय त्यांनी खडसेंच्या अहंकाराला देत सर्वांची मने जिंकली. नेतृत्व, दातृत्व, कर्तुत्व आणि सहृदयत्व याचा संगम मंगेश चव्हाण आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन माजी आमदार घोडे यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, सचिन पानपाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जिल्हा उपाध्यक्ष के. बी. दादा साळुंखे, ज्येष्ठ नेते सुरेश सोनवणे, आनंदा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती माजी सभापती संजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक संजय रतन सिंग पाटील, माजी नगराध्यक्ष आशालता चव्हाण, जेष्ठ नेते विश्वास चव्हाण, माजी मार्केट सभापती मच्छिंद्र राठोड, रवी पाटील, सरदार शेठ राजपूत, ज्येष्ठ नेते राजू चौधरी, रमेश सोनवणे, ए. ओ. पाटील, शेषराव बापू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल नागरे, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीष बऱ्हाटे, दूध संघ संचालक रावसाहेब भोसले, भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, प्रेमचंद खिवसरा, नमोताई राठोड, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, रिजवाना खान, अॅड. धनंजय ठोके, हेमराज बाविस्कर, किशोर पाटील, नितीन पाटील, बाळासाहेब राऊत, आबा पाटील,  सुभाष पाटील, रवी पाटील, चिराग शेख, चंदू तायडे संभाजी राजे पाटील, पियुष साळुंखे, अलकनंदा भवर, राजू बाबू राठोड, डॉ. महेंद्र राठोड, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, भैय्यासाहेब पाटील, जगदीश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बागुल, महेश शिंदे, अयास पठाण, शिवदास महाजन, सुनील पवार  यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. भाजपा शहर व ग्रामीण मंडळाच्या वतीने आ. मंगेश चव्हाण यांना सन्मानपत्र देणून गौरविण्यात आले. तसेच मधुकर काटे, के. बी. साळुंखे, घृष्णेश्वर पाटील, अमोल पाटील, रवि पाटील, सरपंचांच्या वतीने शैलेंद्रसिंग पाटील, जितेंद्र वाघ यांनी आपली  मनोगते व्यक्त केली.

Protected Content