नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपचे विद्यमान कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांना बढती मिळून ते आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. ते विद्यमान कार्याध्यक्ष असून आता ते अमित शहा यांची जागा घेणार आहेत. त्यांची आज बिनविरोध निवड झाली असून निवड समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी नड्डा यांच्या निवडीची घोषणा केली. अमित शाह यांना गृहमंत्रीपद मिळाल्याने ते राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. यानुसार जे.पी. नड्डा यांना बढती मिळाली असून आता त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद आले आहे. त्यांनी आज अमित शाह यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.