मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजपच्या विरोधात शिवसेना पूर्ण ताकदीने प्रतिकार करीत आहे, त्यामानाने राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या बाबतीत मात्र नरमाईची भूमिका घेत असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जात असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षात कोणत्या न कोणत्या कारणावरून कुरबुरी होत आहेत, हे सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी कॉंग्रेसचे २५ आमदार नाराज असून राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सातत्याने शिवसेना तोंड देत प्रतिकार करीत आहे. असे असताना दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष मात्र भाजपच्या विरोधात नरमाईची भूमिका घेत आहे. ज्या प्रखर आक्रमकपणाने प्रतिकार व्हायला हवा तो होताना दिसत नसल्याचे शिवसेनेच्या पक्षातील मोठया नेत्याकडून बोलले जात आहे.
राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद असून केंद्रीय तपास यंत्रणाचा सामना करताना पोलीस प्रशासन महत्वाचे आहे. परंतु राष्ट्रवादी बहुतांश नेते नेमके याच ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारांकडे बोलले. यावर भाजपचा सामना प्रखरतेने महाविकास आघाडीने करावा असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आहे.
आम्ही एकटे काम करीत नसून सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे तिन्ही मिळून महाविकास आघाडी आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील, काम करताना एकमेकांना मदत करण्याचाच प्रयत्न असतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी बोलताना म्हटले आहे.