पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील जारगाव येथून भांडे विक्री व्यावसायिकाची ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हैतरोज सुलेमान पठाण (वय-५५) रा. तामिळनाडू ह.मु. जळगाव ता. पाचोरा हे व्यक्ती अल्युमिनियमचे भांडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची दुचाकी (टीएन ५७ बीयु ७६०७) दुचाकी असून या दुचाकीच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन भांडी विक्रीच्या व्यवसाय करत असतात\ 29 नोव्हेंबर रात्री ९ ते ३० नोव्हेंबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीची ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वसंत पाटील करीत आहे.