धरणगाव प्रतिनिधी । चाऱ्याने भरलेला ट्रक चाळीसगावकडे जात असतांना धरणगाव – पारोळा रस्त्यावर विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील चाऱ्याने पेट घेवून ट्रकसह चारा जळून खाक झाला आहे. तब्बल एक तासांनतर अग्निशमन बंबाने आग विझविली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली होती.
याबाबत माहिती अशी की, बिलखेडा येथून रमेश रतन वाघ यांचा मालकीचा ट्रक क्रमांक एमएच 19 झेड 6613 चारा भरून चाळीसगावकडे धरणगाव पारोळा मार्गे जात असतांना विजेच्या स्पर्श झाल्योन चाऱ्याने पेट घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूला संजय आत्माराम पाटील यांच्या मालकीच्या शेतात चालकाने ट्रक नेला आणि ट्रकमधून उडी घेवून जीव स्वत:चा जीव वाचविला. एक तासापासून पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर येथे फोन करून देखील अग्निशामक गाडी आली नाही त्यामुळे चाऱ्यासह गाडी जळून खाक झाली. धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजप गटनेते कैलास माळी, अॅड.शरद माळी, प्रा.बी.एन. चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे आदींनी अग्निशमन दलास फोन लावून मदत कार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. गावातील, परिसरातील शेतकऱ्यांनी मदत केली.
शेतकऱ्यांचा संताप
या परिसरात विजेच्या तारा लोंबकळत आहेत नेहमी आगीच्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. तब्बल दीड तासानंतर पारोळा,धरणगाव येथील अग्निशामक दलाच्या वाहन येऊन गाडी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.
शेतीचे नुकसान
ज्या शेतात आग विझविण्यासाठी गाडी टाकण्यात आली त्या शेतातील शेत मालाचे देखील खूप नुकसान झाले.