भरारी फाऊंडेशनतर्फे बहिणाबाई महोत्सावाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागरपार्क येथे भरारी फाऊंडेशनच्या वतीने १९ ते २३ जानेवारी या पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, लोक कलावंत विनोद ढगे यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे

जळगाव शहरातील भरारी फाउंडेशनच्या वतीने गेल्या ८ वर्षांपासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये बचत गटासह लोक कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. याच अनुषंगाने भरारी फाउंडेशनच्या वतीने १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान सागर पार्क येथे पाच दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. महिला बचत गटाचा महत्वपूर्ण सहभाग राहणार असून यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील देण्यात आले आहे. यामध्ये खानदेशातील लोककलेसोबत महाराष्ट्रातील नामवंत अशी लोककलावंतांना कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेले आहे. बहिणाबाई खाद्य महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांना जळगावकरांकडून विशेष मागणी असते. यात भाकरी, शेवभाजी, पुरणपोळी यासह खानदेशातील विविध खाद्यपदार्थांचा या समावेश असतो तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहिणाबाई पुरस्कार व बहिणाबाई विशेष सन्मान पुरस्कार देण्यात या कार्यक्रम देखील घेण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले. जात असून जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी हजेरी लावत असतात, अशी माहिती देखील भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी दिली आहे.

Protected Content