जळगाव प्रतिनिधी । भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या अविरत सेवेमुळे एकूण आजपर्यंत १३७ रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी डॉ.केतन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ. लक्ष्मणसिह राजपूत नर्सेस उपस्थित होते. व अपर्णताई भट्ट भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे, तेजस पाठक बाळू परदेशी उपस्थित होते.
भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे 50 खाटांचे सी सी सी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे. आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीष कुलकर्णी अपर्णताई भट्ट यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले. निसर्गोउपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी 8 ते 8:30 या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत.
रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांत कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिष शहा, नंदू आडवाणी, अनिल भोकरे, डॉ.राजेश पाटील, सपन झुनझुनवाला, सुशील नवाल, सुनील झंवर, आदेश ललवाणी, अनिल कांकरिया, सभापती सुचिता हाडा,रवींद्र लढा, नरेशजी खंडेलवाल, अमर कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर आपले अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.