भरधाव दुचाकी बैलगाडीला आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहुर ते वाकोद रोडवर एका शेताजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट बैलगाडीवर आदळल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विजय रमेश पांढरे (वय-३५) रा. कुंभारी बुद्रुक ता.जामनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी २० ऑगस्ट  रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पहुर ते वाकोद रोडवरील विजय भाऊराव पांढरे यांच्या शेताजवळून विजय रमेश पांढरे हा त्याची दुचाकी (एमएच ४५ यु ८१४३) ने पहूरहून वाकोदकडे येत असताना. विजयचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीने थेट बैलगाडीवरती धडक दिली. या धडकेत विजय पांढरे हा जागीच ठार झाला.  तर त्याच्यासोबत असलेले जगन भाऊराव गोपाळ हा जखमी झाला आहे.  याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख करीत आहे.

Protected Content