जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप ललवाणी (वय-६५) रा. आदर्श नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते शतपावली करण्यासाठी काव्यरत्नावली चौकात पायी जाण्यासाठी निघाले. शहरातील आरटीओ कार्यालयाजवळून जात असतांना भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीयू ७४९२) यातील कारचालकाने त्यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत दिलीप ललवाणी हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कारचालक हा कार घेवून पसार झाला होता. स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांनी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जखमी दिलीप ललवाणी यांची पत्नी कुसूमबाई ललवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात कार क्रमांक (एमएच १९ सीयू ७४९२) वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.