भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आठवडे बाजारातील पोलीस चौकसमोर कारच्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती, या अपघातप्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर शुक्रवारी कारचालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील गटाणी चाळ येथे विलास रमेश सपकाळे वय ४० हे वास्तव्यास आहे, ते २४ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव शहरातील आठवडे बाजारात पोलीस चौकीसमोरुन दुचाकीने जात असतांना एम.एच.43 ए.एल.5944 या क्रमाकांच्या कारने विलास सपकाळे यांच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत विलास सपकाळे हे खाली पडून त्याच्या कंबरेला दुखापत झाली, अपघातानंतर कारचालक निघून गेला होता, या अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर विलास सपकाळे यांनी गुरुवार, ९ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन एम.एच.43 ए.एल.5944 या क्रमाकांच्या कारवरील चालक राहूल शेवाळे रा. कासमवाडी ता.जळगाव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पवार हे करीत आहेत.

Protected Content