चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील दर्गापरिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार, पिडीता ही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ती तिच्या आईसोबत पाच महिन्यापूर्वी चाळीसगाव येथे फुगे विकण्याच्या व्यवसायासाठी कामानिमित्त आले होते. पाच महिन्यापुर्वी एका दिवशी (निश्चित तारिख माहिती नाही) दिवसभर काम करून शहरातील दर्गा परिसरात झोपलेले असतांना दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी मुलीला चाकूचा धाक दाखवून आमच्या सोबत ये, नाहीतर तुझ्या आईला ठार मारेल अशी धमकी दिली. अल्पवयीन मुलीला घेवून जावून थोड्या अंतरावर नेले. तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. घटनेची वाच्यता केल्या जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात पिडीता मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निसाय सय्यद करीत आहे.