भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगावातील गेल्या १०० ते १५० वर्षाची परंपरा असलेल्या भगवान श्रीरामाच्या रथांची मिरवणूक श्रीराम नवमी नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे कामदा एकादशीच्या दिवशी भडगाव शहरात रथाची मिरवणूक काढण्यात येते, हि परपंरा चालत असतांना या रथाचे चारही जाक फार जिर्ण अवस्थेत आल्याने गावात रथ फिराया फार त्रास होत होता. यामुळे मागील वर्षी सर्व भडगांवकरांच्या सहकार्याने श्रीराम रथाची दुरुस्ती व नवीन चाक निर्मिती साठी गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असावा म्हणून श्रीराम भक्तनी घरोघरी जाऊन देणगी गोळा केली त्या देणगीचा स्वप्नपूर्ती सोहळा म्हणचे या नविन तयार करण्यात आलेले रथाचे चार चाक या चाका साठी लागणारे सागाचे लाकूड हे आमरावती जिल्हातील परतवाडा येथुन मागवण्यात आले.
भडगांवातील राजेंद्र वाघ (सुतार ) यांनी गेल्या दोन महिन्या पासुन याच्या कुशल कारीगीरी करून हे चाक तयार केले . सुधाकर जाधव या लोहार बंधूनी मांडोळी चढवण्याचे काम केले . अनिल पाटील सोयरा वेल्डींग या कारागीरांनी लोखंडी काम केले परशराम पेंटर यानी आपल्या कुशल असे रंगकाम करून दोन महिन्यापासुन सुर असलेले हे काम आज पुर्णरूपात आले या चाकाच्या मिरवणुक सोहळा पाहण्यासाठी सर्व श्रीराम भक्तांनी व नागरीकांनी आज गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ८ वा चाकाची दर्शन व पुजन मिरवणूक इंदर कॉमप्लेक्स टोणगांव येथुन बसस्टॅण्ड मार्गे मेनरोड श्रीराम मंदिर बाजार चौका पर्यंत निघणार आहे व गुढी पाडव्याच्या या शुभ दिनी रथाला हे नविन चाक बसविण्यात येणार आहे तरी सर्वनी दर्शन व पुजनाचा लाभ घ्यावा व मिरवणुकीत सहभाग घ्यावा असे अवाहन श्रीराम रथ उत्सव समिती भडगांव तर्फे करण्यात आले आहे .