भडगाव प्रतिनिधी । भारतात संसर्गजन्य साथरोग कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यासाठी भारतात २१ दिवसाचा लॉकडाउन ठेवण्यात आला असला तरी येथील माऊली हॉस्पीटलमध्ये पोलिसांची तपासणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी सुरू आहे. राज्यासह संपुर्ण भारतात पोलिस बांधव आपले घरदार परिवार सोडुन जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडित आहे. ते आपल्यासाठी २४ तास जिवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत असतांना त्यांचा पण जिव आहे त्यांना विचारणाराही कोणीतरी पाहिजे म्हणुन भडगांव येथील माऊली हॉस्पीटल संचालक डॉ.गणेश अहिरे आज पुढे सरसावले आहे. त्यांनी भडगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे, पोलिस उपनिरिक्षक आनंद पठारे, परि.पो.उपनिरिक्षक सुशिल सोनवणे यांच्यासह भडगांव पो.स्टेच्या संपुर्ण स्टॉपचे आज २९ रोजी मेडिकल तपासणी करून त्यांच्या स्वता: च्या सुरक्षासाठी मास्क व सॅनिटाईझर वाटप केले व सर्व पोलिस बांधवानचे कौतुक व अभिनंदन केले यावेळी माऊली हॉस्पीटलचे संचालक डॉ. गणेश सुदर्शन अहिरे, इंजि. विजयकुमार सुदर्शन अहिरे, फॉर्मासिस्ट स्वाती अहिरे, इंजि. संगिता अहिरे, लॅब आसिटंन्ट जिग्नेश पाटील, प्रविण पाटील, मनिष सोनवणे माऊली हॉस्पीटल स्टॉप उपस्थित होता. अशा या स्तृत्य उपक्रमाचा बाबत भडगांव येथील माऊली हॉस्पिटलचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. तसेच अजुनही आपण पोलिसांना सहकार्य करा.घराच्या बाहेर पडु नका गर्दी करू नका आत्यावश्क असेल तरच घराच्या बाहेर पडावे स्वता: ची काळजी घ्या!