भडगाव, प्रतिनिधी।कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या योजना प्रभावीपणे राबविणेकामी केलेल्या सहकार्यमुळे व उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्रीराम समर्थ केटर्सचे तथा माळी समाज पंच मंडळ अध्यक्ष प्रकाश महाजन यांना “कोरोना योध्दा” म्हणुन आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण तथा भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे हजर होते.
तहसील कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम घेऊन कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. तहसीलदार माधुरी आंधळे यांनी कोरोना काळात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यवसायीक प्रतिष्ठान, व्यवसायीक बांधव यांना मदतीचे आवाहान केले होते. यावेळी शहरातील श्रीराम समर्थ केटर्सचे संचालक तथा माळी समाज पंच मंडळ अध्यक्ष प्रकाश महाजन, जगदंबा टेटं हाऊसचे अविनाश महाजन, शरद हिरे, शिव भोजन चालक रविद्र महाजन, नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील यांनी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करत कोविड-१९ काळात शासनाला वेळोवेळी मदत केली म्हणुन त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला. यावेळी नाभिक समाज उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, कार्यकारणी सदस्य शिवाजी शिरसाठ, प्रतिक जैन, पकंज झंवर, तलाठी राहुल पवार आदि उपस्थिती होती.