जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात अजून १५ रूग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून यातील सर्वाधीक १३ रूग्ण हे भडगावातील असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
आज रात्री जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार- जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, पाचोरा, रावेर, शेंदूर्णी, पहूर आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 134 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 119 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंधरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील तेरा, सावखेडा, ता. पाचोरा येथील एक व रावेर येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 38 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.