मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची आज ईडीने तब्बल नक्ष तास चौकशी केली असून ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.
एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल अटक केल्यानंतर ईडीने आज सकाळी अकरा वाजता खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यानुसार आज सकाळी ते अकराच्या सुमारास दाखल झाले. यानतर तब्बल नऊ तास चौकशी झाल्यानंतर ते बाहेर पडले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही.
मात्र एकनाथराव खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून एकनाथराव खडसे यांची नऊ तास चौकशी करण्यात आल्याचे सांगितले. ईडीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले नाही. मात्र जेव्हाही त्यांना बोलावले जाईल तेव्हा ते येतील अशी ग्वाही आम्ही दिल्याचे ते म्हणाले.