ब्रेकींग : अखेर ‘त्या’ आरटीओ चेकपोस्टवर नाशिकच्या पथकाची धाड !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र जोडणारा पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रूपयांची वसूली केली जात असल्याच्या प्रकाराबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आज नाशिक येथील पथकाने छापा टाकून चौकशीला सुरूवात केली आहे.

 

मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रूपयांची वसुल करून भ्रष्टाचार केला जात आहे. चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहनचालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी वाहन असतात. अशावेळी त्यांच्याकड एकादा कागदपत्र कमी असला, तर त्यांच्याकडून वसुली केली जाते. अशी माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार खळबळून जागे झाले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी गौप्यस्पोट केल्यानंतर महाराष्ट्र मध्यप्रदेश आरटीओ चेक पोस्ट नाक्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

 

या ठिकाणी बोगस व बनावट पावत्या देवून केंद्र शासनाची व राज्य शासनाची मोठी फसवणूक केली जात आहे. वारंवार यासंदर्भात व्हिडीओ पुरावे सादर केले. त्यांनी केलेल्या माहितीनुसार राज्य सरकार खळबळून जागे झाले असून आज मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र जोडणारा आरटीओ चेक पोस्टवर नाशिक येथील डीएम पथकाने धाड टाकली आहे. यामध्ये पथकाने काटे तपासणी व इतर माहिती  प्रकाराबाबत कसून चौकशीला सुरूवात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुक्ताईन नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.

Protected Content