जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।
जळगाव वडीलकीच्या नात्याने वडील आणि मोठ्या भाऊ यांनी गावात नेहमी भांडण करतो या कारणावरून लहान भावाला चापट मारल्याच्या याल रागातून निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडिलांचे तोंड दाबून चाकूने वार करून खून केला तर भावाला देखील त्याच टाकूने पोटात घुपसून दुहेरी खून प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दंडाची शिक्षा सुनावली आहे
जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात आनंदा कडू पाटील हे वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा निलेश हा ट्रॅव्हल्सवर चालक होता तर लहान मुलगा महेंद्र हा चटई कंपनीत कामाला होता. ११ जुलै २०२० रोजी महेंद्र हा पत्नीसह आपल्या गावी मुक्कामी गेला होता. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ निलेश याने घराजवळ राहणाऱ्या पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत वाद घातला. यावेळी लहान भाऊ महेंद्र याने मोठ्या भाऊ निलेश याला समजावून घरी आणले. त्यानंतर वडीलकीच्या नात्याने निलेश याला गावात नेहमी भांडण करतो म्हणत वडीलांसह लहान भावाने दोन-चार चापटा मारल्या. त्यानंतर सर्वजण झोपून गेले होते. दरम्यान, आनंदा पाटील हे पत्नीसह घराच्या बाहेर ओसरीवर खाट टाकून झोपलेले असतांना निलेश याने त्याच्या वडीलांचे तोंड दाबून हातातील चाकूने भोसकून खून केला. हे बघून त्याच्या आईने ओरडून भैय्या पळ असा आवाज दिला. तो आवाज ऐकून महेंंद्र हा पत्नीसह खोली बाहेर आला असता, त्याच्या भावाने वडीलांचे तोंड दाबले होते आणि त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले. वडीलांना वाचविण्यासाठी महेंद्र हा गेला असता, मारेकरी निलेश याने त्याच्या हातातील चाकू लहान भावाच्या पोटात खूपसून त्याचा देखील खून केला. यावेळी तो वहीनीच्या देखील अंगावर धावून गेला. मात्र त्यांनी पळत जावून घराचा दरवाजा बंद केल्याने त्या बालंबाल बचावल्या होत्या. यापकरणी महेंद्र याची पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पहुर पोलीसात दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या न्यायालयात चालला. यावेळी एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये घटनास्थळावरील पुराव्यांसह प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरीत मारेकरी निलेश पाटील याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र सैंदाणे यांनी काम काज पाहिले.