जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षत्याग करणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. सरकारनामा वृत्तपत्राच्या पोर्टलवर नाथाभाऊंनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ही बातमी वाचून माझीपण करमणूक झाल्याचे सांगत हे वृत्त नाकारले.
राज्याच्या राजकारणात आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासून दबदबा कायम ठेवणाऱ्या राज्यातील निवडक नेत्यांपैकी नाथाभाऊ एक समजले जातात. महाराष्ट्रात युतीचे सरकार येणे हे अभुतपुर्व सत्तांतर समजले जात होते. युती सरकारच्या मंत्री मंडळात त्यांना अग्रक्रमाने मंत्रीपद मिळालेले होते. त्यानंतरच्या राजकीय घडमोडींमध्ये मिळालेली विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी त्यांनी चोखपणे सांभाळली. विरोधीनेते म्हणून विधानसभेत आपला आक्रमक पणा त्यांनी त्या काळातील सत्ताधाऱ्यांना दाखवून दिला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. ते घटस्थापनेच्या मुहूर्तावर ती राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. नंतर मात्र अद्यापही त्यांनी याप्रकरणी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे एकनाथराव खडसे पक्षांतर करणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांनी आज रविवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता ते भाजपचा त्याग करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे तर आता ती नेमकी राष्ट्रवादीत केव्हा प्रवेश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. सरकारनामा पोर्टलने याबाबतचे वृत्त नुकतेच जाहीर केले आहे. तथापि या वृत्ताला अजूनही एकनाथराव खडसे यांच्यातर्फे दुजोरा मिळालेला नाही.