ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी फायझरच्या लशीला मंजूरी

 

 

 

लंडन : वृत्तसंस्था ।  ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर  लशीला मंजूरी मिळाली आहे.

 

ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी  फायझर व बायोटेकद्वारे बनवलेल्या कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की ही लस १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे. अमेरिकेने आणि युरोपियन संघानेही फायझरच्या लशीसाठी असेच मूल्यांकन केले होते.

 

मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, “आम्ही १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे काळजीपूर्वक परीक्षण केले आणि ही लस  सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.”

 

 

Protected Content