केंब्रिज, ( ब्रिटन ) : वृत्तसंस्था । सर्वांत प्रथम भारतात सापडलेला डेल्टा विषाणू आता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून तो जास्त संसर्गजन्य आहे.
काही तज्ज्ञांच्या मते तो आधीच्या अल्फा विषाणूपेक्षा १०० पट अधिक संसर्गजन्य असून पण केवळ त्यामुळे तो जास्त घातक विषाणू आहे असे म्हणता येत नाही.
जे विषाणू जास्त घातक असतात त्यांच्यातील जैविक उत्परिवर्तने महत्त्वाची असतात. त्यामुळे त्यांचा प्रसार लोकांमध्ये वेगाने होतो. आता हा जो विषाणू तयार झाला आहे तो नैसर्गिक किंवा कृत्रिम निवडीच्या तत्त्वातून एकमेकांना वरचढ ठरण्याच्या प्रक्रियेतून तयार झाला आहे. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत.
डेल्टा विषाणूचा ज्या लोकांशी संपर्क झाला त्यातून गुंतागुंत निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. असे असले तरी विषाणूची पसरण्याची व संसर्गाची ताकद जशी महत्त्वाची आहे तसाच त्याचा यशस्वीतेचा दर महत्त्वाचा आहे. काही वेळा चुकीच्या धोरणांचेही कारण विषाणू जास्त पसरण्यामागे असू शकते.
डेल्टा विषाणूचा विचार करायचे म्हटले तर त्याची लसीकरण करण्यात आलेल्या लोकांना लागण होण्याची क्षमता व पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना संसर्ग करण्याची क्षमता यात फरक आहे. फायझर व अॅणस्ट्राझेनेका या लशींच्या दोन मात्रा दिलेल्या व्यक्तींमध्ये या विषाणूपासून ८८ टक्के संरक्षण मिळाले आहे तर एक मात्रा मिळालेल्या व्यक्तींना ३३.५ टक्के संरक्षण मिळाले आहे, असे पब्लिक हेल्थ इंग्लंड या नियतकालिकात म्हटले आहे. ब्रिटनमध्ये दाट लोकवस्ती असलेल्या बोल्टन भागात हा विषाणू पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात पसरला. त्यामुळे त्याच्या पसरण्यात सरकारी धोरणांचा संबंध असू शकतो.
अमेरिकेत डेल्टा विषाणूचा धोका कमी करण्यासाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. ब्रिटनमध्ये अॅास्ट्राझेनेकाच्या दोन मात्रांमधील अंतर उलट वाढवण्यात आले. विषाणू उत्क्रांती तत्त्वाच्या आधारे कृत्रिम निवडीच्या तत्त्वात जे रूप धारण करतो तेही यात महत्त्वाचे असते.