लंडन : वृत्तसंस्था । ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहामध्ये पंतप्रधान जॉन्सन यांनी वंशभेदासंदर्भात केलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करतानाचं पत्रक हातामध्ये पकडलं होतं.
या पत्रकावर जॉन्सन हे २०१९ च्या जी-७ संम्मेलनामध्ये मोदींशी हस्तांदोलन करतानाचा फोटो छापण्यात आलाय.
ब्रिटनच्या संसदेमधील कनिष्ठ सभागृहामध्ये म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षाचे नेते केर स्टारामर यांच्यामध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकावरुन वाद झाला.
या पत्रकावर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही टीका केलीय. भारतीयांनी हे पत्रक विभाजन करणारं आणि भारताविरोधी असल्याचं म्हटलं आहे.
“टॉरी (या) खासदारांची (कन्झर्व्हेटीव्ह पक्षाच्या खासदारांसाठी वापरला जाणार शब्द) चिंता करु नका ते तुमच्या पक्षात नाहीयत,” असं म्हटलं आहे. हे वाक्य वंशभेद करणारं आणि समाजामध्ये भेदभाव करणारं असल्याची टीका केली जातेय.
जॉन्सन यांनी लेबर पार्टीच्या नेत्यांकडे ही पत्रकं मागे घेण्याची मागणी केली. या पत्रकांचा वापर नुकताच उत्तर इंग्लंमध्ये बॅटले आणि स्पेन येथील जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी करण्यात आला होता. या ठिकाणी विरोधी पक्षाने विजय मिळवला आहे.
“सध्या माझ्या हातामध्ये असणारं हे पत्रक त्यांनी मागे घ्यावं असं मी विरोधी पक्षाला सांगू शकतो का. बॅटले आणि स्पेनमधील पोटनिवडणुकीच्यादरम्यान हे पत्रक प्रकाशित करण्यात आलं होतं. या पत्रकावर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी वंशभेदाला अधोरेखित केल जात असल्याची टीका केली होती,” असं जॉन्सन म्हणाले.
लेबर पार्टीचे नेत्यांनी इंग्लंडच्या फुटबॉलपटूंवर मैदानामध्ये झालेल्या वंशभेदाच्या टीप्पण्यांवर सत्ताधारी कंझर्व्हेटीव्ह पक्षाने निषेध नोंदवला नाही म्हणून गोंधळ घातला.
“हे खूप सोप आहे, पंतप्रधानांनी वंशभेदाच्या विरोधात इंग्लंडच्या खेळाडूंसोबत उभं रहावं किंवा त्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील नेत्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांचं समर्थन करावं. मात्र ते दोघांपैकी काहीच करु शकत नाही,” असा टोला जॉन्सन यांना स्टारमर यांनी लगावला.
“आपल्या मंत्र्यांवर टीका करण्यामध्ये आलेल्या अपयशासाठी आपण खेद व्यक्त करतो असं ते म्हणून शकतात का. वंशवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांसोबत उभं राहिल्याबद्दल ते खेद व्यक्त करतील का?,” असं स्टारमर यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी गृहमंत्री प्रीति पटेल यांचा संदर्भही दिला.
या निवडणुक प्रचाराच्या पत्रकावरुन ब्रिटनमध्ये वाद शिगेला पोहचला असून लेबर पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबर भारतीयांनीही याचा विरोध केला आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे उद्योजकांनी तसेच पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख सदस्य असणाऱ्या मनोज लाडवा यांनीही नाराजी व्यक्त केलीय.
“हे फार निराश करणारं आणि हैराण करणारं आहे की लेबर नेते कीर स्टारमर यांनी लेबर पार्टीकडून प्रचारासाठी छापण्यात आलेल्या आणि वंशवादाला पाठिंबा देणाऱ्या तसेच भारताविरोधात असणाऱ्या पत्रकाचा निषेध केला नाही. हा मुद्दा पंतप्रधान जॉन्सन यांनीच उपस्थित केलेला,” असं मनोज म्हणालेत