यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल शिवारातातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६२ हजार ५oo रुपये किंमतीच्या ठिबक सिंचन नळ्या व शेती साहीत्य चोरीस नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोरावल खुर्द ता.यावल येथील राहणारे दिनेश अमोल पाटील व माधुरी दिनेश पाटील या शेतकऱ्यांच्या बोरावल खुर्द शिवारातील मालकीच्या शेत गट क्रमांक ९ मधील .९५ आर क्षेत्रफळात लावण्यात आलेल्या नेटाफिम कंपनीच्या ठिबक सिंचनच्या दोन क्विटंल ४५ किलो वजनाच्या सुमारे ६० हजार रूपये किंमतीच्या नळ्या व २ हजार ५०० रूपये किंमतीच पीव्हीसी कंपनीचे १o नग पाईप अज्ञात चोरट्यांनी १७ ते १८ मे दरम्यान चोरून नेल्याचे उघडकीस आले. यावल पोलीस स्टेशनला दिनेश पराशर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार अजीज शेख हे करीत आहे.