यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल खुर्द येथील पद्माकर पितांबर महाजन यांच्या घरातून ९७ हजार रूपयांचे ऐवज आज सकाळी लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील पद्माकर पितांबर महाजन हे घरास कडी लावून भास्कर पुंडलीक सपकाळे यांच्या सोबत गावातील ंमदिराकडे जाण्यास निघाले मात्र सपकाळे हे त्यांच्या सोबत न जात गावातील बसस्थानकाकडे निघाले. पद्दमाकर महाजन हे मंदिरावर काही मित्रा समवेत चर्चा करून अर्ध्या तासाने आपल्या घरी परतल्यानंतर त्यांना स्वयंपाक घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील ६९ हजाराची रोकड व २७ हजाराचे सोन्याचे दागीने त्यात ९ हजार रुपये किमतीचे तीन अंगठया, १२ हजार रुपये किमतीचे लहान मुलाचे हाताील कडे व सहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम पत्नीच्या कानाती सोन्याच्या बाह्या असा ९७ हजाराचा ऐवज अज्ञात चोरटयाने लंपास केल्याचे निर्दशनास आले. त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या भास्कर सपकाळे यांचेवर संशय व्यक्त केल्यानुसार भास्कर सपकाळे (राहणार पिंप्री ता. यावल) यांच्या विरूध्द भादंवी कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र खैरनार, हे. कॉ संजय तायडे यांनी संशयीतास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.