यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोरावल खुर्द येथे मागील आठवड्यात पद्माकर महाजन यांच्या घरातील भरदिवसा झालेल्या घरफोडीतील आरोपीच्या शोध मार्गावर असतांना या चोरी संदर्भात आणखी गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांना एका आरोपीला शिताफीने पकडण्यात यश आले आहे.
यासंदर्भात मिळालेले वृत्त असे की, यावल तालुक्यातील बोरावल खुर्द या गावात मागील आठवड्यात पद्माकर महाजन यांच्या घरातून ६९ हजार रूपये रोख आणि २७ हजार रूपयांचे दागिनी असे एकुण ९७ हजार रूपये भरदिवसा चोरीस गेले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका पिंप्रीच्या एका संशयिताला चौकशी कामी ताब्यात घेतले होते नंतर आज २४ फेब्रुवारी २०२० रोजी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना भालशिव गावातील पोलीस पाटील सचिन तायडे यांनी दूरध्वनी करून या घरफोडीच्या चोरीतील आरोपी शंकर काशिनाथ सोनवणे हा आरोपी हाडकाई नदीच्या काठी असलेल्या सिताराम कोळी यांच्या केळीच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी सापळा रचुन या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न करत असतांना चोरट्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास जेरबंद केले आहे.