बोरनार येथे महिलेच्या पतीला मारहाण करत विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील बोरनार येथे महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला तर तिच्या पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव तालुक्यातील बोरनार येथे २४ वर्षीय महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. १९ मे रोजी मध्यरात्री महिला घरात झोपलेली असतांना गावात राहणारे सोनू रामदास मराठे, योगेश सुभाष पवार, शोभाबाई सोनू मराठे आणि जयेश उर्फ दादू सोनू मराठे सर्व रा. बोरनार ता.जि.जळगाव या चौघांनी महिलेच्या घरात घसून तिचा विनयभंग केला. तर महिलेचे पती यांला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, महिन्याभरानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर शनिवारी १७ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.

Protected Content