बोरखेडा हत्याकांड प्रकरण : संशयितांचा जामीन न होण्यासाठी युक्तीवाद; पुढील सुनावणी १८ जून रोजी

भुसावळ ,संतोष शेलोडे । रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे चौघा भावंडाच्या हत्याप्रकरणात अटकेतील पाचही आरोपींना जामीन मिळू नये यासाठी आज भुसावळ कोर्टात सुनावणी होणार असून यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे शासनाची बाजू मांडली. यासंदर्भात पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. 

 

ॲड. निकम म्हणाले की, बोरखेडा हत्याकांडातील पाचही संशयित आरोपींना जामीन मिळू नये यासाठी आज भुसावळ न्यायालयात सरकारपक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. हत्याकांडातील परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अहवाल, संशयित आरोपींनी त्यांच्या वडीलांसमोर दिलेली कबुली यासंदर्भात युक्तीवाद करण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे.

 

काय आहे ही घटना

रावेर- बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार  १६ ऑक्टोबर २०२० रोजी आज सकाळी उघडकीस आला होता. बोरखेडा  शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला त्याची पत्नी रुमली बाई भिलाला व दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते. घरात दोन मुले आणि दोन मुली अशी चारही मुले एकटी होती.चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुर्‍हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली होती.

त्यातील सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली. या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुकेश संन्याल, राज उर्फ गुड्ड्या, सुनील सीताराम, अल्पवयीन मुलगा व अन्य एक असे एकुण पाच जणांना या गुन्ह्यात अटक केली होती.

Protected Content