धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा गावातील शेतकऱ्याच्या गोडाऊन मधून ट्रॅक्टरच्या चार बॅटऱ्या, ट्रॅक्टरचे साहित्य असे एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गजानन रवींद्र चव्हाण (वय-३३) रा.बोरखेडा ह.मु.पिंप्री ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बोरगाव येथे त्यांचे शेतीचे सामान ठेवण्यासाठी गोडाऊन केलेले आहे. या ठिकाणी ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या तसेच ट्रॅक्टरसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आलेले होते. दरम्यान ५ फेब्रुवारी रात्री ८ ते ६ फेब्रुवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडमधून ट्रॅक्टरच्या चार बॅटऱ्या हायड्रोलिक जॅक ट्रॅक्टरचे साहित्य, ग्राईंडर ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गजानन चव्हाण यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे करीत आहे.