बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लाबविणारा सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

बोदवड प्रतिनिधी । डेअरीचा भरणा करण्यासाठी आलेल्या ८ लाख ४० हजार रूपयांनी भरलेली पिशवी अज्ञात चोरट्यांने हातचालाखीने लंपास केल्याने एक खळबळ उडाली आहे. दरम्यान, बँकेच्या सीसीटीव्ही हा प्रकार कैद झाला आहे. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मुक्ताईनगररोडवरील स्टेट बँकेत अमर डेअरीचे मालक अमर खत्री यांच्या डेअरीचा भरणा करण्यासाठी वाहन चालक उमेश रमेश महाजन (वय-४०) रा. बोदवड हे सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास आले. सुमारे ९ लाख रूपयांचा भरणा करण्यासाठी दोन पिशव्या आणल्या होत्या. एका पिशवीत ६० हजार तर दुसऱ्या पिशवीत ८ लाख ४० हजार रूपये ठेवले होते. सुरूवातीला त्यांनी ६० हजार रूपयांची रक्कम भरणा करण्यासाठी बँक कॅशियरकडे दिली. त्यावेळी ८ लाख ४० हजार रूपये ठेवलेली पिशवी जवळ असलेल्या खुर्चीवर ठेवली. ६० हजार रुपयांची रक्कम बँक कॅशिअरला मोजून देत असतांना जवळच खाली खुर्चीवर ठेवलेली दुसरी पिशवी जाभळ्या रंगाचा शर्ट घातलेला अज्ञात २० ते २५ वर्षाचा तरुण चोरटा दुसरी हिरव्या रंगाच्या पिशवी लंपास केली. वाहन चालक उमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात गुन्हा नोद करण्यात आला आहे.

अज्ञात चोरटा ८ लाख ४० हजार रूपयांची रोकड असलेली पिवशी लंपास करतांनाचा प्रकार बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अश्याच प्रकारची चोरी मागील काळात पण झाली होती. खंडेलवाल पेट्रोल पपंचे मॅनेजर स्टेट बँकमध्ये भरणा करण्यासाठी आला असता त्याची पैश्यानी भरलेली बॅग घेऊन अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे लवकरात लवकर लावला होता. पण आजच्या परिस्थितीत कोरोना महामारी असल्यामुळे चोरट्याच्या तोंडावर मास्क लावले असल्यामुळे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर ही चोरी मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीरात हिरे करीत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/379285209892703/

Protected Content