बोदवड येथे राष्ट्रीय काँग्रेस यांची बैठक !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरातील भरत पाटील यांच्या कार्यालयात राष्ट्रीय काँग्रेस यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. राहुल गांधी यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल केला याचा निषेध या बैठकी करण्यात आला.

याबाबत सविस्तर असे की, बोदवड येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद नुकतीच घेतली त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल केला त्या विषयावर ही बैठक घेण्यात आली आहे. अदानी यांचा भ्रष्टाचार राहुल गांधी यांनी संसदेत उघड केल्याचा राग शासनाला आला. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करून त्यांचे खासदार पद रद्द केले व त्यांच्या राहत्या बंगला देखील रिकामा करावा अशी नोटीस पाठवण्यात आली.या अनुषंगाने बोदवड येथील भरत आप्पा पाटील यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवुन शासनाने केलेल्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीमध्ये डॉ जगदीश पाटील (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग) दिनेश पाटील (तालुका अध्यक्ष) मुक्ताईनगर,संजय पाटील (जिल्हा सरचिटणीस तथा बोदवड निरीक्षक ) बाळासाहेब पाटील ज्येष्ठ नेते, डॉ. विष्णू रोटे( जिल्हा काँग्रेस पदाधिकारी )राजेंद्र जाधव (मुक्ताईनगर तालुका कार्यकारी अध्यक्ष),नरेश पाटील (युवक तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर ), भरत पाटील (बोदवड तालुका अध्यक्ष), वीरेंद्र सिंग पाटील (ज्येष्ठ कार्यकर्ते),बाळू पाटील (जेष्ठ कार्यकर्ते), सागर पाटील (जिल्हा उपाध्यक्ष )इत्यादी जन कार्यक्रमाला उपस्थित होते

Protected Content